मतदारसंघातील गावे विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी माझे प्रयत्न सतत सुरू आहेत. काही गावे तर मी दत्तकही घेतली आहेत. आज त्या गावांचा चेहरामोहरा बदलला आहे. सरतेशेवटी गावाच्या एकीनेच गावाची प्रगती होत असते. हीच एकी विधानसभेच्या प्रचारार्थ गाव भेटी संवाद दौऱ्यात माझ्या पाठीशी असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बुधवारी कल्याण तालुक्यातील दहागांव, मांजर्ली, वाहोली, आपटी, आपटी चोण, रायते, आणे, भिसोळ, नाळींबी, घोटसई, मानिवली, गुरवली, गुरवली पाडा आणि निंबवली या गावांना भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधला.
यावेळी मानिवली गावातील माझ्या लाडक्या बहिणींनी गावरान शैलीत गाणे गाऊन कार्याचे कौतुक केले. पुन्हा कमळ फुलवून विजयाचा एल्गार पुकारत या माता-भगिनींनी प्रचारात आणखी उत्साह भरला. महिला, गांवकरी, तरुण वर्ग, महायुतीचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते या सर्वांच्या भरघोस प्रतिसादाबद्दल मनापासून आभार मानले.