VIKASPARV 5.0

Menu
Logo

प्रेमाची लाट, विजयाची साद – मुरबाडमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याचा उत्सव!

प्रेमाची लाट, विजयाची साद ! मुरबाडमध्ये आज पाचव्यांदा विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचा उमेदवार म्हणून अर्ज भरताना कार्यकर्ते, हितचिंतक आणि सर्वसामान्य जनतेचा उत्साह थक्क करणारा होता. हजारोंच्या संख्येने उपस्थित जनतेच्या या प्रेमाच्या लाटेने माझा विजय सुनिश्चित झाला आहे. मुरबाडमध्ये भाजपचे कमळ फुलणार यावर जणू शिक्कामोर्तबच झाले आहे. हजारोंची गर्दी ठरली विजयाची नांदी ! गुरूवारी गुरूपुष्पामृत योगाच्या मुहुर्तावर हजारो कार्यकर्ते आणि हितचिंतकांच्या उपस्थितीत मुरबाड तहसील कार्यालयात पाचव्यांदा निवडणुकाचा अर्ज भरला. तत्पूर्वी बदलापूर ते मुरबाड अशी भव्य रॅली काढत लाडक्या माता भगिनी, ज्येष्ठ नागरिक यांचे आशिर्वाद घेतले. यावेळी आयोजित सभेत बोलताना मला माझाच विक्रम मोडायचा आहे, असे सांगत यासाठी मला तुमची साथ हवी आहे, असे आवाहन उपस्थितांना केले. यावेळी भाजपचे केंद्रीय महासचिव विनोद तावडे यांनी उपस्थितांना ‘तुम्ही कथोरे साहेबांना आघाडी द्या, ते मंत्रिमंडळात गेल्याशिवाय राहणार नाहीत’ अशी ग्वाही दिली. सकाळी बदलापूर आणि मुरबाडमधील मंदिरांमध्ये देवांचे आशिर्वाद घेत रॅलीला सुरूवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना विनम्र अभिवादन केले. त्यानंतर मुरबाडकडे प्रवास करताना रस्त्यात जागोजागी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. मुरबाड शहरात भव्य रॅली काढण्यात आली होती. त्यासाठी मुरबाड, बदलापूर, अंबरनाथ तालुका, कल्याण तालुका, शहापूर तालुका आणि आसपासच्या तालुक्यातून हजारोच्या संख्येने माझ्यावर प्रेम करणारी मंडळी जमली होती. यावेळी महायुतीतील विविध घटक पक्षांचे समर्थकही उपस्थित होते. त्यात निरीक्षक आणि मध्य प्रदेशातील राज्यसभा खासदार कविता पाटीदार, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, शिवसेनेचे महाराष्ट्र सहसचिव एकनाथ शेलार, परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले, भाजपचे राम पातकर, रिपाइंचे दिने उघडा यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा समावेश होता. गेल्या निव़डणुकीत मला १ लाख ३६ हजारांहून अधिक मताधिक्य मिळाले होते. यंदाच्या निवडणुकीत यापेक्षा अधिक मताधिक्य मिळविण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. कार्यकर्त्यांचे प्रेम आणि पाठिंबा पाहून मी भारावून गेलो. त्यांचे मनापासून आभार मानले. #Kisankathore #Bjp4Maharashtra

जनतेच्या सेवेसाठी, विकासाच्या वचनबद्धतेसह

LET'S TALK