VIKASPARV 5.0

Menu
Logo

बदलापुरातील प्रभागांसाठी विकासाच्या वचनासह महायुतीला पाठिंबा: संयुक्त सभेत रामनगर आपटेवाडी येथील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

कुळगाव बदलापूर नगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक ३६, ३७, ३८, ३९ यांची संयुक्त जाहीर सभा रामनगर आपटेवाडी येथे संपन्न झाली. यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मला पाठिंबा दिला. बदलापूर शहराच्या पायाभूत सुविधांसाठी गेली अनेक वर्ष विविध विकास योजना राबवीत आलो आहे. शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता मुबलक पाण्याची तजवीज केली. मजबूत काँक्रिटचे रस्ते, आरोग्य सुविधा, तलावांचे सुशोभीकरण, उद्याने आणि स्मारक अशी अनेक विकासकामे मार्गी लावण्यात यश मिळाले. महायुती सरकारच्या माध्यमातून भविष्यातही आणखी जोमाने नवनवीन विकास प्रकल्प राबण्यासाठी पुन्हा एकदा ‘कमळ’ चिन्हासमोरील बटन दाबून संधी देण्याचे आवाहन केले.

जनतेच्या सेवेसाठी, विकासाच्या वचनबद्धतेसह

LET'S TALK