मुरबाड मतदारसंघातील ग्रामीण भागात दीपावली पाडवा आणि बलिप्रतिपदा म्हणजेच गोवर्धन पूजा केली जाते. शेतकरी कुटुंबात घरोघरी बैल पूजन करून, त्यांना सजवून गावातून वाजत गाजत नेण्याची परंपरा आजही कायम आहे. आज बदलापूर गाव येथे उपस्थित राहून बळीराजाचा जिवाभावाचा सोबती असलेल्या बैलावरच्या प्रेमाचे दर्शन झाले. यानिमित्ताने माझा गांवकरी एकत्र येऊन गुण्या गोविंदाने सण साजरा करतो, आपली संस्कृती, प्रथा आणि परंपरा जोपासतो याचे विशेष आनंद वाटले.