गेले काही दिवस निवडणुकीनिमित्त सुरू असलेली प्रचाराची धावपळ संपून आज मोठ्या उत्साहात मतदान पार पडले. संपूर्ण मुरबाड तालुका, कल्याण तालुक्याचा काही ग्रामीण भाग, अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर शहर आणि काही गावे अशा मोठ्या मतदार संघाचे मी प्रतिनिधीत्व करतो. या सर्व विभागातील रहिवाशांनी मोठ्या उत्साहाने आज मतदान केले. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीतील अन्य पक्ष तसेच संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सकाळपासून नियोजनबद्ध पध्दतीने काम केले. कोणत्याही राजकीय पक्षांशी थेट संबंध नसणारे, परंतु माझ्यावर प्रेम करणारे अनेक नागरिक उत्स्फूर्तपणे मतदानाविषयी जनजागृती करीत होते. त्यात काही संस्थांचे प्रतिनिधीही होते. माझ्या कार्याविषयी आदर असणारे राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इतर शुभेच्छुक नागरिकांचा मी मनापासून आभारी आहे, कृतज्ञ आहे.
या मोठ्या प्रतिसादाने २३ नोव्हेंबरला मुरबाड मतदार संघात काय निकाल लागणार हे सूर्य प्रकाशाइतके स्पष्ट झाले आहे. आता पुन्हा नव्या जोमाने कामाला लागूया. परिसराचा विकास हाच आपला एकमेव ध्यास आहे. एकमेकांवर कुरघोडी न करता एकमेकांच्या साथीने पुढील वाटचाल करूया. मी मागेच म्हटल्याप्रमाणे या निवडणुकीच्या रिंगणात मी निमित्तमात्र होतो. माझ्या रूपाने येथील सर्वसामान्य जनताच निवडणुकीच्या रिंगणात होती. जनतेनेच विकासाला कौल दिला आहे, असे मी मानतो. निवडणुकीच्या धावपळीत कळत नकळतपणे कुणी दुखावले गेले असेल तर मोठ्या मनाने विसरून जा. पुढील काळात आपल्याला महाराष्ट्रातील एक आदर्श मतदार संघ अशी मुरबाडची ओळख करायची आहे. त्यासाठी एकजुटीने आणि गुण्यागोविंदाने काम करूया..!
आपल्या हक्काचा
किसन कथोरे
महायुतीचे अधिकृत उमेदवार, मुरबाड विधानसभा मतदार संघ,