निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसा भाजप आणि महायुतीला मुरबाड मतदार संघात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळू लागला आहे. शुक्रवारी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक श्री.निलेशजी सांबरे यांनी कल्याण तालुक्यातील निंबवली येथे प्रचारादरम्यान माझी भेट घेऊन महायुतीला संघटनेचा पाठिंबा जाहीर केला. तत्पूर्वी मुरबाडमध्ये सकाळी ‘जिजाऊ’चे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात हा निर्णय झाला. निलेश सांबरे आणि जिजाऊ संघटनेचे मनापासून आभार.