VIKASPARV 5.0

Menu
Logo

मुरबाडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक; महायुतीच्या एकजुटीवर विश्वास

मुरबाड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक आज महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष श्री. प्रमोदजी हिंदुराव यांच्या मुरबाड येथील कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीत उपस्थित राहून संवाद साधला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सद्या विरोधकांकडून महायुती सरकारबद्दल फेक नरेटिव्ह पसरवले जात आहे. नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करून मतदारांची दिशाभूल करण्याचे षडयंत्र विरोधक रचत असतात. मात्र मायबाप जनता कोणत्याही अफवांना बळी पडणार नाही. कामाच्या जोरावर महायुती मजबुतीने उभी आहे. युतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते एकजुटीने आणि एकदिलाने कामाला लागली आहे. त्यामुळे महायुतीचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून येतील, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.

जनतेच्या सेवेसाठी, विकासाच्या वचनबद्धतेसह

LET'S TALK