मुरबाड विधानसभा मतदारसंघात गाव भेटी दौरा सुरू आहे. आज मुरबाड तालुक्यातील शिरवली जिल्हा परिषद गटातील गेटवाडी, पाटगाव, बाटलेवाडी, मोहघर, म्हसा, कान्होळ, तोंडली, सासणे, न्हावे, काकडपाडा, जानपाटलाचापाडा, शिरवली बौद्ध वस्ती, शिरवली गाव, मानिवली पाडा आणि वडाची वाडी या गावांना भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधला.
यावेळी तळागाळातील गावांमधून गावकऱ्यांचा मिळणारा पाठिंबा विजयाचा विश्वास देत आहे. लहानग्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वच मोठ्या संख्येने मला आशीर्वाद देण्यासाठी आवर्जून उपस्थित राहत होते. सरतेशेवटी आपली ओळख कामातून होते हे प्रकर्षाने दिसून आले. मतदारसंघातील विकासाच्या दृढ विश्वासाने मुरबाड विधानसभेवर पुन्हा एकदा 'कमळ' फुलवून विक्रम गाठुया, असा निर्धार करत मायबाप जनतेचे आभार मानले.