VIKASPARV 5.0

Menu
Logo

मुरबाड विधानसभेसाठी दृढ साथ: गाव भेट दौऱ्यातून जनतेचा उस्फूर्त प्रतिसाद!

मुरबाड विधासनभा निवडणुकीच्या प्रचारार्थ माळ जिल्हा परिषद गटातील गाव भेटी संवाद दौऱ्यात चासोळे, सुकाळवाडी, आंबिवली, जांभूळवाडी, जडई, भांगवाडी, तळेगाव, शेलगाव, कुंडाचीवाडी, मुख्याचीवाडी, खरशेत, मांदोशी, उमरोली, शाई, फांगलोशी, बुरसुंगे, शिवेचीवाडी, वेळूक, खुटल, शिरोशी आणि लाकूडपाडा या गावांना भेट देऊन गावकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. मतदानाला जवळजवळ आठ दिवस शिल्लक आहेत. जसजसे प्रचाराचे दिवस कमी होताहेत, तसतसा प्रचाराचा जोर वाढतोय. तितकाच नागरिकांचा पाठिंबाही वाढत आहे. जल्लोषात स्वागत, माय-माऊलींकडून औक्षण आणि ग्रामस्थांच्या आपुलकीने विश्वासाचे नाते तयार झाले आहे. माझे हे मातीतले दृढ नाते येत्या २० नोव्हेंबरला मुरबाड विधानसभेवर ‘कमळ’ फुलवेल याची खात्री आहे.

जनतेच्या सेवेसाठी, विकासाच्या वचनबद्धतेसह

LET'S TALK