उल्हासनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्या वास्तूचे काम मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे अंबरनाथ आणि परिसरातील शेतकरी बांधवांची सोय होणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्या इमारतीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. लवकरच हे काम सुरू होणार आहे. गेली अनेक वर्ष उल्हासनगर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार हा भाड्याच्या इमारतींमधून चालवण्यात येत होते, मात्र आता प्रशस्त अशी कृषी उत्पन्न बाजार समितीची वास्तू उभी राहणार आहे.