VIKASPARV 5.0

Menu
Logo

अंबरनाथ-नालिंबी-रायते रस्त्यासाठी ३० कोटी

अंबरनाथ शहर कल्याण ग्रामीण भागाला जोडणारा महत्त्वपूर्ण रस्ता अंबरनाथच्या चिंचपाडाडून नालिंबी गावामार्गे रायते गावाजवळ निघतो. पुढे हा रस्ता मुरबाडच्या दिशेने, तर एक रस्ता कल्याणच्या दिशेने जातो. त्यामुळे अंबरनाथ शहर, मुरबाड आणि कल्याणला सहजरित्या जोडलं जावं यासाठी नालंबी-रायते या रस्त्याचं कॉक्रिटीकरण करण्यात आलं आहे. या सोबतच नालिंबी ते अंबरनाथच्या चिंचपाड़ा खदानीपर्यंत रस्त्याचं काँक्रिटीकरण करण्यात येत असून, या सर्व कामांसाठी तब्बल ३० कोटीहून अधिकचा निधी मंजूर करण्यात आला आहे. डोंगरातून जाणारा हा रस्ता वाहतुकीसाठी जितका सोयीचा आहे, त्यापेक्षा जास्त पर्यटक फ्रेंडली आहे. या ठिकाणी संध्याकाळी पर्यटक आणि शहरवासीय मोकळी हवा घेण्यासाठी मोठ्या संख्येनं येत असतात. त्यामुळे या रस्त्याचे मजबुतीकरण या ठिकाणच्या निसर्गप्रेमींसाठी उपयुक्त ठरणार आहे. यासोबतच इथं सकाळ- संध्याकाळ वॉक करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची देखील चांगली सोय होणार आहे.

जनतेच्या सेवेसाठी, विकासाच्या वचनबद्धतेसह

LET'S TALK