वांगणी – काराव उल्हास नदीवरील पूलः वांगणी रेल्वे स्थानकातून ग्रामीण भागांना जोडण्यासाठी वांगणी आणि काराव या गावांच्या मध्यभागी उल्हास नदीवर १५ कोटी रुपये खर्च करून नवा पूल उभारण्यात आला आहे. या पुलामुळे अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण भाग बदलापूर आणि वांगणी रेल्वे स्थानकाशी जोडला गेला आहे. या ठिकाणी जुना पूल जीर्ण झाल्यामुळे नवीन पुलाचा प्रस्ताव आमदार किसन कथोरे यांनी मांडला होता. डोणे-निकोप पूलः आमदार किसन कथोरेंच्या माध्यमातून उल्हास नदीवर होत असलेला निकोप-डोणे पूल वांगणी आणि आसपासच्या परिसरासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
ठाणे आणि रायगड या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या या पुलामुळे निकोप, मानिवली, वरई, अवसारे ही गावं थेट वांगणीशी जोडली जाणार आहेत. आतापर्यंत नेरळला वळसा घालून १५ ते २० कि.मी. चा प्रवास करावा लागत होता. तो हेळपाटा आता वाचणार आहे.