गोवेली, म्हसा येथे लॉ कॉलेज कल्याण तालुक्यातील गोवेली आणि मुरबाड तालुक्यातील म्हसा इथे लॉ कॉलेज मंजूर करण्यात आली असून कायद्याचे शिक्षण घेत असलेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची त्यामुळे सोय झाली आहे. जीवन शिक्षण मंडळ संचलित म्हसा येथील लॉ कॉलेजला सौ. कमलताई किसन कथोरे यांचे नाव देण्यात आले आहे.
उप आरोग्य केंद्रः कल्याण तालुक्यातील कुंदे, जांभूळ आणि दहिवली इथे स्थानिक नागरिकांना चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र उप आरोग्य केंद्र कार्यान्वित करण्यात आली आहेत.