VIKASPARV 5.0

Menu
Logo

नाचू किर्तनाचे रंगी!

दरवर्षी नवीन वर्षाची सुरूवात बदलापूरमध्ये आमदार किसन कथोरे यांच्या पुढाकाराने आयोजित राष्ट्रीय कीर्तन महोत्सवाने होते. अंबरनाथ तालुका अध्यात्मिक उत्सव समितीच्या वतीने हा कीर्तन महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. अतिशय व्यस्त दिनक्रम असूनही आमदार किसन कथोरे या सप्ताहातील कीर्तन महोत्सवात उपस्थित राहून विठुनामाच्या गजरात रंगून जातात. यंदाही कुळगावातील मराठी शाळेच्या पटांगणात कीर्तन महोत्सव अतिशय भक्तीभावाने साजरा झाला. महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आणि प्रवचनकारांनी या सप्ताहात त्यांचे विचार मांडले. बदलापूर आणि परिसरातील हजारो भाविकांनी त्याचा लाभ घेतला.

जनतेच्या सेवेसाठी, विकासाच्या वचनबद्धतेसह

LET'S TALK