VIKASPARV 5.0

Menu
Logo

पर्यटकांना खुणावतोय माळशेज घाट

तीन जिल्ह्यांना जोडतो वाहतुकीच्या दृष्टीने माळशेज घाट अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. हा घाट ठाणे अहमदनगर आणि पुणे या तीन जिल्ह्यांना जोडतो. शिर्डी, शनिशिंगणापूर, भीमाशंकर या धार्मिक स्थळांना जाण्यासाठी भाविक याच मार्गाने जातात. पुण्याकडे जाताना वाटेत शिवरायांची जन्मभूमी असलेला शिवनेरी किल्ला लागत असल्याने शिवप्रेमी याच मार्गाने जाणे पसंत करतात.
पावसाळी पर्यटनाची पर्वणी माळशेज घाट आणि पावसाळा यांचे अनोखे नाते आहे. पावसाळ्यात येथील निसर्ग सौंदर्य डोळ्यांचे पारणे फेडतो. घाट माथ्यावरून कोसळणारे छोटे छोटे धबधबे पर्यटकांना खुणावत असतात. रोड साईड पावसाळी पर्यटनाचा आनंद देणार हक्काचे ठिकाण म्हणजे माळशेज घाट…

ट्रेकर्सची पहिली पसंती माळशेज घाटाच्या उत्तरेकडे हरिश्चंद्रगड असून दरवर्षी शेकडो पर्यटक हरिश्चंद्रगडाला भेट देतात. हरिश्चंद्र गडावर जाताना लागणारी टोलारखंड आणि कोकणकडा ट्रेकर्स मंडळींना खुणावत असते, येथील पुरातन शिवमंदिर आणि राजा विश्वमित्राचे मंदिर पाहण्याजोगे आहे. त्यामुळे शिवभक्त हरिश्चंद्रगडावर जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर करतात.

जनतेच्या सेवेसाठी, विकासाच्या वचनबद्धतेसह

LET'S TALK