VIKASPARV 5.0

Menu
Logo

बदलापुरात जगातील पहिले मोतीबिंदू सोशल रिसर्च सेंटर

गेली तीन दशके अंबरनाथ, कल्याण, मुरबाड आणि शहापूर परिसरात साकिब गोरे आणि सहकाऱ्यांच्या वतीने सुरू असलेल्या नेत्र चिकित्सा आणि उपचार सेवेचा लवकरच विस्तार होणार आहे. कात्रप परिसरातील पनवेल महामार्गालगत नेत्र चिकित्सा आणि जनजागृती करणारे एक भव्य सेवा केंद्र उभारण्यात येणार असून त्याचे भूमिपूजन एप्रिल महिन्यात झाले. आमदार किसन कथोरे साहेबांच्या पुढाकाराने सुरू असलेला हा अत्यंत महत्वाचा असा आरोग्यदायी उपक्रम असून आता मुरबाड मतदार संघाबाहेर ठाणे जिल्ह्यातील अन्य तालुक्यातही नेत्र चिकित्सेची ही सेवा अविरत सुरू आहे. १९९२ पासून बदलापूर गावातील साकिब गोरे सहकाऱ्यांच्या मदतीने नेत्र चिकित्सा शिबिरे आयोजित करीत आहेत. आतापर्यंत या मोहीमेत २० लाख नागरिकांची विनामूल्य नेत्र तपासणी करण्यात आली. १५ लाख जणांना चष्मे देण्यात आले आणि ५६ हजार जणांच्या मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या. १२१७ गावांपर्यंत ही नेत्र चिकित्सेची चळवळ पोहोचली. आमदार किसन कथोरे यांचे मार्गदर्शन आणि सहकार्यातून हा आरोग्यदायी उपक्रम चालवला जातो. आता या प्रकल्पाच्या विस्तारीकरणात पनवेल हायवेलगत ४२ हजार चौरस फूट जागेत भव्य नेत्र चिकित्सा सेवा केंद्र उभारण्यात येत आहे. या केंद्रात नेत्र चिकित्सेच्या अद्ययावत सुविधा असतील. तसेच डोळ्यांच्या विकारांविषयी जनजागृतीही केली जाईल. या उपक्रमाला उत्पन्नाचे स्त्रोत मिळावे या हेतूने या प्रकल्पात अद्ययावत सभागृह, हॉटेल आदी सुविधा असतील. त्यातून मिळणारे प्रकल्पासाठी उत्पन्न या वापरले जाणार आहे. या सेवा प्रकल्पस्थळी जगातील सर्वात मोठी चष्म्याची आणि मोतीबिंदू झालेल्या डोळ्याची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. सध्या डोळ्याची सर्वात मोठी प्रतिकृती अमेरिकेत टेक्सासमध्ये तर चष्म्याची प्रतिकृती नेदरलॅन्डमध्ये आहे.

९ रुपयांमध्ये चष्मा गरीब व्यक्ती खर्च नको म्हणून चष्मा वापरणे टाळतात. त्यामुळे हळूहळू त्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो, हे वास्तव लक्षात घेऊन या नेत्रदान चळवळीत अवघ्या नऊ रुपयांमध्ये चष्मा उपलब्ध करून देत असल्याची माहिती साकिब गोरे यांनी दिली.

जनतेच्या सेवेसाठी, विकासाच्या वचनबद्धतेसह

LET'S TALK