VIKASPARV 5.0

Menu
Logo

बदलापुरात दंतचिकित्सेचा शुभारंभ

काका गोळे फाऊंडेशनच्या माध्यमातून संकल्प दंतचिकित्सा केंद्र नुकतेच कार्यान्वित करण्यात आले आहे. खाजगी क्षेत्रात धर्मदाय वृत्तीने सेवा देणारे हे पहिलेच डेंटल क्निनिक आहे. दातांची चिकित्सा, तपासणी आणि उपचार महाग आहेत. ते सर्वसामान्यांना परवडत नाहीत. त्यामुळे अनेक नागरिक दातांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. शिवाय दातांच्या उपचारांसाठी मेडिक्लेमची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे फाऊंडेशनने ही सेवा सुरू केली आहे. इतर सेवांप्रमाणे दंतचिकित्साही ४० टक्के कमी दरात उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रांजली गोळे या दंत चिकित्सा केंद्राचे व्यवस्थापन पाहत आहेत.

जनतेच्या सेवेसाठी, विकासाच्या वचनबद्धतेसह

LET'S TALK