VIKASPARV 5.0

Menu
Logo

बदलापूरमध्ये २०० बेडचे सामान्य रुग्णालय

झपाट्याने नागरीकरण होत असलेल्या अंबरनाथ तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळण्यासाठी सुसज्ज रुग्णालयाची आवश्यकता होती. आमदार किसन कथोरे त्यासाठी आग्रही होते. कारण येथील नागरिकांना आरोग्य सेवेसाठी ठाण्यातील सिव्हील हॉस्पिटलशिवाय सध्या अन्य कोणताही पर्याय उपलब्ध नाही.
अनेकदा तिथे पोहोचेपर्यंत रुग्ण अधिक अत्यवस्थ होतात. वेळेत उपचार न मिळाल्याने रुग्ण दगाविण्याचीही भीती असते. त्यामुळे या अत्यंत महत्वाच्या विषयाबाबत आमदार कथोरे साहेबांचा शासनाच्या आरोग्य विभागाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून बदलापूरमधील उपजिल्हा रुग्णालयाचे विशेष बाब म्हणून सामान्य रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने २५ सप्टेंबर २०२४ रोजी अधिसूचना काढून त्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार सध्या अस्तित्वात असलेल्या उप जिल्हा रुग्णालयाव्यतिरिक्त स्वतंत्रपणे सामान्य रुग्णालय उभारले जाणार आहे. या रुग्णालयात २०० खाटांची सुविधा उपलब्ध होईल. त्यासाठी आवश्यक बांधकाम, पदनिर्मिती करण्याची कार्यवाही स्वतंत्रपणे केली जाणार आहे. त्यासाठी बदलापूर पूर्व विभागातील शिरगावात जागा देण्यात येणार असल्याची माहिती आमदार कथोरे यांनी दिली.

जनतेच्या सेवेसाठी, विकासाच्या वचनबद्धतेसह

LET'S TALK