बदलापूर शहरात झपाट्याने नागरीकरण होत आहे. नागरी वसाहती वाढत आहेत, त्याच प्रमाणे औद्योगिक वसाहती आणि उद्योग वाढत आहेत. या शहरात दिवसेंदिवस विजेची मागणी वाढत आहे. वाढती मागणी आणि उपलब्ध पुरवठा यात ताळमेळ बसविणे आवश्यक आहे. अपुरे साहित्य, अपुरा अधिकारी आणि कर्मचारी वर्ग यामुळे सुद्धा वीज पुरवठा अखंडित सुरु ठेवण्यात अडचणी येत असतात. वीज पुरवठा वाढविण्यासाठी वीज वितरण आणि वीज पुरवठा अधिकाऱ्यांसमवेत सातत्याने चर्चा करून नवनवीन योजना आखण्यात आल्या आहेत. बदलापूर शहराला टाटा कंपनीकडून वीज पुरवठा करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. यास यश मिळत आहे. टाटा कडून वीज पुरवठा सुरु झाल्यावर बदलापूर मधील मागणी आणि पुरवठा यातील तफावत दूर होणार आहे. परिणामी अखंड आणि योग्य दाबाने वीज पुरवठा करण्यात आमदार किसन कथोरे यांच्या प्रयत्नांना यश मिळत आहे.