VIKASPARV 5.0

Menu
Logo

बदलापूर एमआयडीसीत १२८ कोटींची भुयारी गटार योजना ७० कोटींचे काँक्रीट रस्ते

बदलापूरच्या औद्योगिक वसाहतीमधून जे रासायनिक सांडपाणी बाहेर पडतं त्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी भुयारी लाईन टाकण्यात आली आहे. मात्र ती भुयारी लाईन जीर्ण झाल्यामुळे अनेक ठिकाणी भुयारी लाईन फुटून सांडपाणी रस्त्यावर वाहत होते. ही समस्या लक्षात घेऊन आमदार किसन कथोरे यांनी बदलापुरातील एमआयडीसी क्षेत्रात नव्याने भुयारी लाईन टाकून ती शहराबाहेर नेण्याची योजना आखली आहे. त्यासाठी १२८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. औद्योगिक विभागातील रस्त्यांच्या कामांना यापूर्वीच मंजुरी मिळाली असून त्यांचे काम प्रगतीपथावर आहे. एमआयडीसी क्षेत्रात तब्बल ७० कोटी रुपये खर्च करून अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. ते काम देखील अंतिम टप्प्यात आले आहे. जेएनपीटी-वडोदरा महामार्गाचा एक इंटरचेंज बदलापूरच्या ज्युवेली गावात असल्याने स्थानिक औद्योगिक वसाहतीचं महत्व वाढणार आहे. कारखान्यांमधून सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्याच्या व्यवस्थापनासाठी भुयारी गटार योजना लाभदायी ठरणार आहे.

जनतेच्या सेवेसाठी, विकासाच्या वचनबद्धतेसह

LET'S TALK