बदलापूर पश्चिमेला रेल्वे स्थानकाजवळ असणाऱ्या एस.टी. स्थानकाचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. आमदार किसन कथोरे यांच्या प्रयत्नांमुळे त्यासाठी तीन कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. बदलापूर रेल्वे स्थानक ते अंबरनाथ, कल्याण आणि मुरबाड तालुक्याच्या ग्रामीण भागात विविध ठिकाणी बसफेया इथून सुरू आहेत. त्यामुळे या स्थानकात दररोज हजारो प्रवाशांची वर्दळ सुरू असते. त्यात विद्यार्थी, नोकरदार मंडळींची बहुसंख्या आहे. स्थानकाच्या नूतनीकरणामुळे त्यांना अधिक सुविधा मिळणार आहेत.