झपाट्याने विस्तारणाऱ्या बदलापूर शहरातील सांडपाण्याचे योग्यरित्या व्यवस्थापन व्हावे म्हणून लवकरच नव्याने विकसित झालेल्या परिसरात भुयारी गटार योजना शहरात लवकरच राबवली जाणार आहे. अनेक भागात अजूनही भुयारी गटार योजना कार्यान्वित झालेली नाही त्यामुळे सांडपाण्याचे व्यवस्थापन करणे अवघड जात होते. एवढेच नव्हे तर या सांडपाण्यामुळे उल्हास नदीदेखील प्रदूषित होत होती. त्यासाठी नगरोत्थान विभागाकडून ३१६ कोटी रूपयांचा निधी मिळणार आहे. त्याचप्रमाणे मुरबाड शहरासाठीही १७५ कोटींची भुयारी गटार योजना राबवली जाईल. मुरबाड शहरात देखील सांडपाण्याचे योग्य नियोजन व्हावे यासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे.