बारवी डॅम रोडच्या काँक्रिटीकरणासाठी १६० कोटी संपूर्ण ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणाकडे जाण्यासाठी असलेला डांबरी रस्ता पावसाळ्यात काही ठिकाणी खचत असल्यामुळे तो संपूर्ण रस्ता काँक्रीट करण्याचा निर्णय आमदार किसन कथोरे यांनी घेतला आणि त्यानुसार या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी एमआयडीसी प्रशासनाकडे मागणी केली. या रस्त्याचा आराखडा तयार करण्यात आला असून त्यासाठी तब्बल १६० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या कामाची निविदा करून लागलीच कामाला सुरुवात होणार आहे. अंबरनाथच्या वडवली तलावापासून या रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार असून थेट बारवी डॅम पर्यंत हा रस्ता तयार केला जाणार आहे या रस्त्याच्या मजबुतीकरणामुळे बारवी डॅम रोडवर असलेल्या गावांना चांगली कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.