ग्रामीण भागात मंदिर हे समाजपयोगी आणि सार्वजनिक कार्यक्रमांचे केंद्र असते. सर्वसाधारणपणे गावातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या मंदिरांचे हे उपयोगित्व वाढावे या हेतूने आमदार किसन कथोरे यांनी मुरबाड मतदार संघातील अनेक गावातील मंदिरांना सभामंडप मंजूर केले. वारकरी संपद्रायाचे हरीनाम सप्ताह, सभा, मेळावे आदी कारणांसाठी या सभामंडपांचा उपयोग होतो. मुरबाड तालुक्यात ८०, कल्याणमध्ये २३ आणि अंबरनाथ तालुक्यातील १७ मंदिशांमोर सभामंडप उभारण्यात आले आहेत.