श्रीमलंग गडावर फ्युनिक्युलर ट्रेन सुरु करण्याचा आमदार किसन कथोरे यांनी शासनाकडे प्रस्ताव मांडला. ही योजना मार्गी लागण्यासाठी वन खात्याची मंजुरी मिळणे आवश्यक होते. त्यासाठी आमदार किसन कथोरे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. माननीय सर्वोच्च न्यालयाकडूनही या प्रकल्पासाठी आमदार किसन कथोरे यांनी मंजुरी मिळवली. आमदार किसन कथोरे यांच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांना अखेर यश मिळाले. अलीकडेच या फ्युनिक्युलर ट्रेनच्या ट्रायल फेरीने आमदार किसन कथोरे श्री मलंगगडावर जाऊन आले. लवकरच भाविकांच्या आणि पर्यटकांच्या सोयीसाठी फ्युनिक्युलर ट्रेनची सेवा सुरु होईल.