मुरबाड शहरातून जाणाऱ्या कल्याण अहिल्यानगर महामार्गामुळे मुरबाडच्या मुख्य चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे कल्याण अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गांतर्गत मुरबाड शहरात नव्या उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे माळशेज मार्गे नगरला जाणारी सर्व वाहने या उड्डाण पुलावरून सहज मार्गस्थ होणार आहेत. त्यामुळे उड्डाणपुलाच्या खाली असलेला मुरबाडचा मुख्य चौक हा स्थानिक रहिवाशांना विना अडथळा वापरता येणार आहे. येथून स्थानिक वाहनांना देखील सहज मार्ग काढणे सोपे होणार आहे.