VIKASPARV 5.0

Menu
Logo

मुरबाडमधील जलक्रांती

आमदार किसन कथोरे साहेबांचे प्रयत्न आणि पाठपुराव्यामुळे विविध शासकीय योजना अनेक कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून  मुरबाड मतदार संघात सुरू आहेतच, शिवाय काही स्वयंसेवी संस्थाही या मतदार संघात विविध प्रकारचे समाजपयोगी उपक्रम राबवत आहेत. रोटरी, लायन्स क्लब, वसुंधरा संजीवनी मंडळ, नाम फाऊंडेशन आदी संस्था गेली काही वर्षे मुरबाडमध्ये विविध ठिकाणी जलसंधारण प्रकल्प राबवित आहेत. त्यामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात जलसाठा उपलब्ध झाला आहे. या सर्व स्वयंसेवी संस्थांना आमदार कथोरे साहेबांचे सदैव सहकार्य असते. ‘वसुंधरा’ने गेल्या काही वर्षात मुरबाड आणि शहापूर तालुक्यातील ५९ तलावांमधील गाळ काढला. त्यामुळे २९ कोटी लिटर्स अतिरिक्त पाणी ग्रामीण भागात उपलब्ध झाले आहे. 

याच स्वयंसेवी संस्थेने या दोन तालुक्यात ३३ काँक्रिटचे बंधारे बांधले. त्याद्वारे ३१ कोटी लिटर्स पाणी स्थानिकांना उपलब्ध झाले. ३० पर्जन्य जलसंधारण प्रकल्प राबवले, त्यातून दीड कोटी लिटर्स पाणीसाठा झाला. तसेच या दोन तालुक्यात संस्थेने खोदलेल्या १४ शेततळ्यांमधून ८ कोटी लिटर्स जलसाठा झाला असल्याची माहिती संस्थेचे मिलिंद केळकर यांनी दिली. ‘वसुंधरा’ संस्थेने गेल्या ९ वर्षात राबवलेल्या १३६ प्रकल्पांतून ७० कोटी अतिरिक्त जलसाठा स्थानिकांना उपलब्ध झाला आहे. या दोन तालुक्यात बांधलेल्या एकूण ३३ काँक्रिटच्या बंधाऱ्यांसाठी २ कोटी रूपयांचा निधी खर्च झाला आणि त्यातून ३१ कोटी लिटर्स पाणी उपलब्ध झाले. म्हणजे केवळ २० पैसे लिटर दराने पाणी उपलब्ध झाले.

जनतेच्या सेवेसाठी, विकासाच्या वचनबद्धतेसह

LET'S TALK