VIKASPARV 5.0

Menu
Logo

मुरबाड पोलीस स्टेशन

मुरबाडमधील अनेक शासकीय इमारतींची पुनबाँधणी गेल्या पाच वर्षात करण्यात आली. मुरबाड पोलीस ठाण्याची इमारत त्यापैकी एक. मुरबाड पोलीस ठाण्याची शंभर वर्षांपूर्वीची इमारत जीर्ण झाली होती. . त्यामुळे तिचे तातडीने नूतनीकरण करणे आवश्यक होते. शिवाय कर्मचाऱ्यांच्या तुलनेत ही इमारत अपुरी पडत होती. आमदार किसन कथोरे यांनी बारामती येथील पोलीस स्टेशन इमारतीच्या धर्तीवर मुरबाड येथे नवीन इमारत मंजूर करण्याची विनंती शासनाला केली. त्यानुसार शासनाच्या गृह विभागाने नवीन, सुसज्ज इमारतीसाठी ५ कोटी ६३ लाख ८७ हजार रूपयांचा निधी मंजूर केला. १२७७ चौरस मीटर जागेत ही भव्य इमारत उभारण्यात आली आहे. या इमारतीत सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी स्वतंत्र जागा आहेत. तसेच कॅन्टिनची सुविधा आहे.

जनतेच्या सेवेसाठी, विकासाच्या वचनबद्धतेसह

LET'S TALK