• कल्याण तालुक्यातील वासुंद्री येथील तलावात गाळ साचल्याने त्याची साठवण क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे गाळ काढणे, तलावाभोवतीच्या मोकळ्या जागेचे सुशोभिकरण आणि तलाव संवर्धन ही कामे करण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी ४ कोटी, २१ लाख निधीची आवश्यकता आहे.
• मुरबाड तालुक्यातील बागेश्वरी तलाव टप्पा-२ (४.०० कोटी रुपये), तुळई (४ कोटी रूपये), साजई (२ कोटी ५० लाख रूपये), मुळगांव (३ कोटी रूपये), मासले बेलपाडा (२ कोटी ५० लाख रूपये), खुटल (२ कोटी ५० लाख रूपये), खानिवरे (४ कोटी रूपये), चोण (३ कोटी ५० लाख रूपये), आंबेटेंबे (४ कोटी रूपये), बांधिवली (३ कोटी ५० लाख रूपये) वांगणी या तलावांचे संवर्धन आणि सुशोभिकरणाचे प्रस्ताव मान्यतेसाठी शासनाकडे प्रस्तावित 3 आहे.
• कुळगाव-बदलापूर नगरपरिषद हद्दीतील कात्रप (४ कोटी ५३ लाख), ज्युवेली (२ कोटी ८४ लाख), बदलापूर गाय (२ कोटी ३३ लाख) या तलावांचे सुशोभीकरण व संवर्धन करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी भरघोस निधी उपलब्ध करून देऊन पर्यटन व पर्यावरणाला चालना देण्याचा प्रयत्न केला आहे.