VIKASPARV 5.0

Menu
Logo

मृत्यू झालेल्या तरुणांच्या कुटुंबाला मदतीचे धनादेश सुपूर्द

ऑगस्ट महिन्यात मुरबाड नगरपंचायत हद्दीतील शास्त्रीनगर येथील तीन तरुण मासे पकडण्यासाठी बारवी धरण परिसरात टाकीची वाडी येथे गेले असता, त्यातील गणेश केणे आणि ज्ञानेश्वर गोंधळी हे पुराच्या पाण्यात वाहून गेले. या घटनेत गणेश केणे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच, प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या होत्या, तसेच सर्व आवश्यक कायदेशीर प्रक्रिया राबवण्याच्या दृष्टीने प्रशासनाने कार्यवाही सुरू केली.

गुरुवारी, त्याचाच एक भाग म्हणून मी मृतक कुटुंबीयांची भेट घेतली. त्यावेळी गणेश केणे आणि ज्ञानेश्वर गोंधळी यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रूपये मदतीचे धनादेश सुपूर्द केले. या मदतीमुळे कुटुंबीयांना थोडा दिलासा मिळावा आणि त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी, हे लक्षात घेतले.

या प्रसंगी तहसीलदार श्री. अभिजीत देशमुख, मंडळ अधिकारी सौ. सुषमा कुर्ले, तलाठी सौ. हिंदूराव मॅडम, मुरबाड नगरपंचायतीचे नगराध्यक्ष श्री. मुकेश विशे, मा. नगराध्यक्ष रामभाऊ दुधाळे, सचिन चौधरी, मनोज देसले, आणि सुभाष कडव यांची उपस्थिती होती. या सर्वांच्या सहकार्याने कुटुंबीयांना मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला, ज्यामुळे त्यांना काहीसा मानसिक आणि आर्थिक दिलासा मिळाला.

साहेबांचे विकासकार्य Share करा ..!

जनतेच्या सेवेसाठी, विकासाच्या वचनबद्धतेसह

LET'S TALK