मुरबाड मतदार संघातील विविध विकासकामांसाठी कोट्यावधी रूपयांचा निधी मंजूर करून नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देणारे आमदार किसन कथोरे यांची विधानसभेतील कामगिरीही सर्वोत्तम आहे. ठाणे जिल्ह्यातील आमदारांमध्ये सर्वाधिक २७५ प्रश्न आमदार कथोरे यांनी विचारले आहेत. केवळ मतदार संघातीलच नव्हे तर ठाणे जिल्ह्यातील विविध समस्यांना विधानसभेत वाचा फोडण्याचे आणि त्या माध्यमातून अनेकांना न्याय मिळवून देण्याचे महत्वपूर्ण काम आमदार कथोरे अखंडीतपणे करीत असतात.