मुरबाड मतदार संघातील आदिवासी वाड्या वस्त्यांना शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा म्हणून आमदार किसन कथोरे साहेब सातत्याने प्रयत्न करीत असतात. मतदार संघातील अनेक आदिवासी गावपाड्यांपर्यंत उत्तम प्रतीचे काँक्रिटचे रस्ते, पाण्याची सोय आमदार साहेबांनी केली आहेच, शिवाय आदिवासींना वैयक्तिक योजनांचा लाभ मिळावा यासाठीही ते पाठपुरावा करीत असतात. गेल्या पाच वर्षात मुरबाड मतदार संघात विविध योजनांमधून ९०५ आदिवासी कुटुंबांना घरकुले मिळाली. त्यांचा नव्या घरात गृहप्रवेश झाला.