मुरबाड मतदार संघातील सर्व रस्त्यांचा दर्जा सुधारण्यात आला असून त्याअंतर्गत मुरबाडच्या सरळगाव ते शहापूर दरम्यानच्या रस्त्याचे काम करण्यात आले आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणासोबत हा रस्ता वाहतुकीसाठी सुसज्ज करण्यात आला आहे. शासनाच्या हॅम योजनेतून १०० कोटीहून अधिकचा निधी या ठिकाणी मजूर करण्यात आला आहे. पूर्वी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडत होते. आता या रस्त्याचा दर्जा सुधारल्यामुळे वाहतूक जलद गतीने सुरू झाली आहे.