VIKASPARV 5.0

Menu
Logo

सावर्णेत भव्य वारकरी दिंडी भवन

मुरबाड तालुक्यातील माळशेज घाट मार्गाने दरवर्षी शिर्डी, शनि शिंगणापूर, आळंदी या ठिकाणी हजारो भाविक दिंडीने जात असतात. माळशेज घाटाच्या पायथ्याशी असलेल्या सावर्णे गावात त्यांचा विश्रांतीसाठी मुक्काम होतो. राज्याच्या कानाकोपऱ्यातून देवस्थानांना अतिशय श्रद्धेने पायी जाणाऱ्या या भाविकांच्या सोयीसाठी सावर्णे येथे भव्य वारकरी दिंडी भवनाची निर्मिती करण्यात येत आहे. आमदार किसन कथोरे यांनी या योजनेसाठी शासनाकडे पाठपुरावा केला. या प्रकल्पासाठी २५ कोटी रूपयांचा निधी मंजूर असून त्याचे अलिकडेच भूमिपूजन झाले. या भव्य वास्तूत दिंडीतील भाविकांच्या विश्रांती आणि निवासाची व्यवस्था केली जाणार आहे. तसेच त्यांना नाश्ता आणि जेवणही दिले जाईल. विशेष म्हणजे या सर्व सुविधा त्यांना विनामूल्य मिळणार आहेत. या वारकरी भवनाच्या दर्शनी भागात श्री विठ्ठलाची ३५ फुटी भव्य मूर्ती उभारण्यात येणार आहे.

जनतेच्या सेवेसाठी, विकासाच्या वचनबद्धतेसह

LET'S TALK