VIKASPARV 5.0

Menu
Logo

सॅटीस - बदलापूर स्थानक परिसरातील वाहतूक कोंडीचे चक्रव्यूह सुटणार

बदलापूर रेल्वे स्थानक परिसरातील वाढती कोंडी दूर करण्यासाठी ठाण्याप्रमाणेच ‘सॅटिस’ उभारण्याची ‘एमएमआरडीए’ची योजना आहे. आमदार किसन कथोरे यांच्या पाठपुराव्याने हा प्रकल्प लवकरच मार्गी लागणार असून मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. एमएमआरडीएने बदलापूर रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक सुधारणा प्रकल्पासाठी सक्षम यंत्रणांकडून ‘सेंटिस’साठी (स्टेशन एरिया ट्रॅफिक इंप्रूव्हमेंट स्किम) प्रस्ताव मागवले होते. त्यात अनेक उपाय सुचविण्यात आले आहेत. सध्या बदलापूर रेल्वे स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असून त्यातून मार्ग काढताना पादचारी आणि वाहन चालकांचा जीव मेटाकुटीस येतो. सकाळी आणि संध्याकाळी पीक अवरमध्ये मुंबईहून येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीमुळे रेल्वे स्थानक परिसरातून वाट काढणे अतिशय जिकरीचे ठरते. बदलापूर शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने स्थानक परिसरातील ही कोंडी फोडण्यासाठी ‘एमएमआरडीए’ सेंटिस प्रकल्प राबविणार आहे. त्यात रेल्वे स्थानक परिसरात होणारी वाहतूक कोंडी दूर करूनप्रवाशांना ये-जा करणे सोयीचे व्हावे म्हणून पूर्व आणि पश्चिम दोन्ही बाजूंना किमान अर्धा किलोमिटर लांबीचा (५०० मिटर) सेंटीस प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या सेंटिस प्रकल्पात बस स्थानक, रिक्षा स्टॅन्ड, खाजगी वाहनांची पार्किंग व्यवस्था करण्यात येईल. बदलापूर स्थानक परिसरातील कोंडी सोडविण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या सॅटीस प्रकल्पात वॉटर सप्लाय ते समर्थ चौकदरम्यान रेल्वेमार्गाला समांतर पूल उभारण्यात येणार आहे.

जनतेच्या सेवेसाठी, विकासाच्या वचनबद्धतेसह

LET'S TALK