VIKASPARV 5.0

Menu
Logo

अंबरनाथ ते वांगणी राज्य महामार्गाचे काँक्रीटीकरण कोटी

अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांना जोडणारा महत्त्वपूर्ण रस्ता म्हणजे अंबरनाथ बदलापूर वांगणी राज्य महामार्ग. या महामार्गावरूनच पुढे पुण्याच्या दिशेने सहज जाणे शक्य होते. हा संपूर्ण रस्ता डांबरी असल्याने पावसाळ्यात या डांबरी रस्त्यांवर काही प्रमाणात खड्डे पडल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. आमदार किसन कथोरे यांनी ही समस्या कायमची सोडवण्यासाठी या रस्त्याच्या कॉक्रिटीकरणाचे काम हाती घेतले आहे. अंबरनाथ ते वांगणीपर्यंतच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी तब्बल १४८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून त्याचे काम देखील अंतिम टप्प्यात आहे. या मार्गावर काही भागात काँक्रिटीकरण आधीच करण्यात आले आहे, उर्वरित डांबरी रस्त्याचे काँक्रीट करण्याचे काम जलद गतीने सुरू आहे.

बदलापूर ते वांगणी महामार्गासाठी १०३ कोटी बदलापूर शहरातून जाणाऱ्या महामार्गाअंतर्गत बदलापूरच्या खरवई गावापासून वांगणीतील डोणे गावापर्यंत रस्त्याचे कॉक्रिटीकरण करण्यासाठी तब्बल १०३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून त्या रस्त्याच्या कामाला गती मिळाली आहे. खरवई ते गोरेगाव पर्यंतच्या रस्त्यासाठी शासनाच्या हॅम योजनेतून तब्बल ७५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत तर उर्वरित गोरेगाव ते वांगणी या रस्त्यासाठी २८ कोटी रुपये अर्थसंकल्पातून मंजूर करून घेण्यात आले आहे. त्यामुळे १०३ कोटीच्या या रस्त्याचे येत्या काळात पूर्ण काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे.

कात्रप ते चिखलोली महामार्गासाठी ४५ कोटी अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांना जोडणाऱ्या राज्य महामार्गाअंतर्गत कात्रपच्या जान्हवी लॉन चौकापासून चिखलोलीच्या टी सर्कल पर्यंतच्या रस्त्यासाठी तब्बल ४५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून त्याचे काम देखील अंतिम टप्प्यात आहे. कात्रप ते चिखलोली गावापर्यंतच्या रस्त्यासाठी १९ कोटी रुपये तर चिखलोली गावापासून टी सर्कलपर्यंतच्या चौकापर्यंत रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यासाठी २५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. हे कामही अंतिम टप्प्यात आहे.

जनतेच्या सेवेसाठी, विकासाच्या वचनबद्धतेसह

LET'S TALK