VIKASPARV 5.0

Menu
Logo

बदलापूर ते पनवेल प्रवास अवघ्या २० मिनिटात

मुंबई-दिल्ली महामार्गाच्या मुंबई-वडोदरा टप्प्यातील तलासरी पनवेल विभागाचे काम वेगाने सुरू आहे. वर्षभरात महामार्गाच्या या टप्प्याचे काम पूर्ण होणार आहे. या महामार्गामुळे बदलापूरचे महत्व वाढणार आहे. माननीय आमदार किसन कथोरे यांनी सातत्याने मतदार संघात पायाभूत सुविधा आणण्याचा प्रयत्न केला आहे. हा राष्ट्रीय महामार्ग मुरबाड मतदार संघातून जात असल्याने स्थानिकांना त्याचा लाभ होणार आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पातील तलासरी ते पनवेल या १५० किलोमिटर टप्प्याचे काम भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या ठाणे विभागाच्या देखरेखीखाली सध्या सुरू आहे. या मार्गावर अंबरनाथ तालुक्यातील बदलापूरजवळील बेंडशीळ गावाबाहेर डोंगरात पनवेलला जाण्यासाठी ४.१६ किलोमिटर लांबीचा बोगदा खोदण्यात येत आहे. या महामार्गामुळे बदलापूरहून पनवेलला अवघ्या २० मिनिटात जाता येणार आहे. सध्या बदलापूर पनवेल दरम्यानच्या प्रवासासाठी किमान सव्वा तास लागतो. या रस्त्यामुळे नवी दिल्ली ते मुंबई हे अंतर १२ तासात पार करणे शक्य होणार आहे. तसेच ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील महामार्गालतच्या भागाचा कायापालट होणार आहे. विशेष म्हणजे मुंबई महानगर प्रदेशातील बदलापूर आणि पनवेल ही सर्वाधिक वेगाने विकसित होणारी शहरे या महामार्गामुळे अधिक जवळ येणार आहेत.

१२० मिटर लांबीच्या या रस्त्याव्या एकुण आठ मार्गिका असणार आहेत. प्रत्येकी २५ किलोमिटर अंतरावर महामार्गावर जाण्यासाठी तसेच बाहेर पडण्यासाठी मार्गिका असतील. ठाणे जिल्ह्यात भिवंडी, कल्याणजवळील रायता आणि बदलापूरजवळील ज्युवेली गावाजवळ महामार्गावर जाण्याची सोय असेल. या रस्त्यामुळे बदलापूर परिसरातून 

जेएनपीटी बंदर, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ गाठणे अधिक सोपे ठरणार आहे. त्यामुळे बदलापूर ग्रामीण परिसरात ४०० एकर शासकीय जागेत लॉजेस्टिक पार्क उभारण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या विचाराधीन आहे. 

बदलापूर- मुंबई बस सेवा शक्य वडोदरा-जेएनपीटी महामार्गाचे काम वर्षभरात पूर्ण होईल. त्यानंतर बदलापूरहून मुंबईला नियमित बससेवा सुरू करणे सहज शक्य होईल. बदलापूरहून मुंबईला पाऊण ते एक तासात आरामात जाता येईल, त्याचप्रमाणे प्रस्तावीत नवी मुंबई- तळोजा-माळशेज मार्गही मुंबईत लवकर जाण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

जनतेच्या सेवेसाठी, विकासाच्या वचनबद्धतेसह

LET'S TALK