VIKASPARV 5.0

Menu
Logo

बारवी धरणामुळे ठाणे जिल्हयावरील जलसंकट टळले

महाराष्ट्रातील सर्वाधिक वेगाने नागरीकरण होणारा जिल्हा अशी ओळख असणाऱ्या मुंबईलगतच्या ठाणे जिल्ह्यातील वाढत्या शहरांना पुरेसा पाणी पुरवठा व्हावा म्हणून शासनाने नेमलेल्या माधवराव चितळे समितीने २००५ मध्ये काही धरणांची शिफारस केली होती. मात्र यापैकी एकही धरण पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यामुळे ठाणे जिल्ह्यावर जलसंकट ओढावले होते. ठाणे जिल्ह्यातील शहरांची पाणी पुरवठ्याची भिस्त मुरबाड तालुक्यातील एमआयडीसीचे बारवी धरण आणि पुणे जिल्ह्यातील टाटा कंपनीच्या आंध्रा धरणावर अवलंबून आहे. लोकसंख्या झपाट्याने वाढत असताना पाणी पुरवठ्याचे प्रमाण तितकेच असल्याने ठाणे जिल्ह्यातील शहरांना अपरिहार्यपणे कपातीचा सामना करावा लागत होता. मात्र मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांची शिष्टाई आणि पाठपुराव्यामुळे बराचकाळ रखडलेला बारवी विस्तारीकरण प्रकल्प मार्गी लागला. एमआयडीसी अधिकाऱ्यांसोबत आमदार कथोरे साहेब प्रकल्पग्रस्त गावांमध्ये घरोघरी फिरले. त्यांना चांगले पुनर्वसन पॅकेज मिळवून देण्याचे आश्वासन दिले. ठरल्याप्रमाणे प्रकल्पग्रस्तांना घरे, जमिनीचा मोबदला मिळाला. मुरबाड तालुक्यातच त्यांचे पुनवर्सन झाले. शिवाय बारवी धरणाचे पाणी वापरणाऱ्या प्राधिकरणांमध्ये

प्रकल्पग्रस्त प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याचा पथदर्शी निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालील शासनाने घेतला.   बारवीच्या तिसऱ्या टप्प्यात मुरबाड तालुक्यातील तोंडली, काचकोली, मोहघर, काळेवडखळ, सुकाळवाडी आणि मानिवली येथील १२०४ घरे विस्थापित झाली. त्या सर्वांचे पुनवर्सन झाले. पाच सदस्य संख्या असणाऱ्या कुटुंबांना ३७० चौरस मीटर आणि पाचपेक्षा अधिक सदस्यसंख्या असणाऱ्या कुटुंबांना ७४० चौरस मिटरचे भूखंड देण्यात आले. ज्यांना भूखंड नको होते त्यांना अनुक्रमे ६ लाख ६५ हजार रूपये आणि १३ लाख ३० हजार रूपये देण्यात आले. ज्या कुटुंबांना नोकरी नको होती, त्यांना १० लाख रूपयांचे अनुदान देण्यात आले. एमआयडीसी प्रशासनाने त्यांच्या हिश्स्याच्या २०९ प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्याही दिल्या. इतर प्राधिकरणांमध्ये ती प्रक्रिया सुरू आहे.  प्रकल्पग्रस्तांची भरपाई आणि नवीन पुनर्वसीत गावांमध्ये पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी एमआयडीसी प्रशासनाला १८८ कोटी १० लाख रूपये निधी लागला. मूळ गावांपेक्षा पुनर्वसीत गावातील घरे अधिक प्रशस्त आहेत. गावठाण परिसर सुटसुटीत आणि सुनियोजित आहे.

जनतेच्या सेवेसाठी, विकासाच्या वचनबद्धतेसह

LET'S TALK