Phone
+91 9422073551Address
Kasturi Niwas, Chatrapati Sambhaji Nagar, Murabad, Maharashtra 421401© Alrights reserved
by MLA Shri Kisan Kathore
मुंबईहून पुणे आणि नगर जिल्ह्यात जाणारा एक महत्वाचा मार्ग अशी ओळख असणाऱ्या कल्याण-माळशेज अहमदनगर निर्मल राष्ट्रीय महामार्ग क्र. ६१ चा प्रवास आता अधिक जलद आणि सुलभ होणार आहे. या रस्त्याच्या ठाणे जिल्ह्यातील ४८.८८ किलोमिटर मार्गाचे काही ठिकाणी दुपदरीकरण आणि चौपदरीकरणासह काँक्रिटीकरणाचे काम सध्या सुरू आहे. मुरबाड मतदार संघातील दळणवळण आणि पायाभूत सुविधांच्या सक्षमीकरणासाठी आमदार किसन कथोरे यांच्या प्रयत्नातून सुरू असलेल्या प्रकल्पांपैकी हा एक महत्वाचा प्रकल्प आहे.
मार्च २०२४ मध्ये सुरू झालेले हे काम दीड वर्षात पूर्ण करण्याची मुदत आहे. त्यामुळे पुढील वर्षी दिवाळीपर्यंत हे काम पूर्ण होईल, असा अंदाज आहे. या कामासाठी ४१८ कोटी ६८ लाख रूपये खर्च होणार आहेत. . या महामार्गावर पाचवा मैल ते मुरबाड या २६ किलोमिटर लांबीच्या रस्त्याचे चौपदरीकरणासह काँक्रिटीकरण होईल. तसेच कदमपाडा ते सावर्णेदरम्यानच्या २५ किलोमिटर लांबीच्या रस्त्याचे दुपदरीकरणासह काँक्रिटीकरण होईल. या कामामुळे मुरबाडच्या दळणवळणात मोलाची भर पडणार आहे.
Website and App developed by WE-cts
© 2024 | All rights reserved by Shri. Kisan Kathore