VIKASPARV 5.0

Menu
Logo

मुरबाडमधील ग्रामीण रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी १९७ कोटी

मुरबाड मतदार संघातील मुरबाड तालुक्यात मोठ्या प्रमाणात काँक्रीट रस्त्यांच्या कामासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. मुरबाड तालुक्यातील प्रत्येक गावात काँक्रीट रस्त्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. अवघ्या दोन वर्षात विविध योजनेतून तब्बल १९७ कोटी केवळ मुरबाडसाठी मंजूर करण्यात आले आहेत. त्यात अर्थसंकल्पीय तरतुदींसोबतच आदिवासी विकास योजना, विशेष रस्ता कार्यक्रम, नाबार्ड योजना, नाविन्यपूर्ण योजना, आमदार स्थानिक विकास कार्यक्रम, डोंगरी विकास कार्यक्रम, जिल्हा नियोजन साकव योजना, पर्यटन विकास कार्यक्रम, ग्रामविकास कार्यक्रम अशा शासनाच्या विविध योजनेतून हा निधी मुरबाडच्या विकासासाठी उपलब्ध करून देण्यात आमदार किसन कथोरे यांना यश आले आहे.

जनतेच्या सेवेसाठी, विकासाच्या वचनबद्धतेसह

LET'S TALK