VIKASPARV 5.0

Menu
Logo

मुरबाड बसस्थानक गावपाड्यांमध्ये ए.सी. ईलेक्ट्रीक बस धावणार

ठाणे जिल्हयाच्या ग्रामीण भागात अजूनही राज्य परिवहन महामंडळाची एस.टी. सेवा मुख्य वाहतुकीचे साधन आहे. मुरबाड परिसरही त्याला अपवाद नाही. मुरबाडहून कल्याण, शहापूर, अंबरनाथ, कर्जत परिसरात स्थानिक स्वरूपाच्या सेवा आहेत. शिवाय पुणे, नगरमार्गे महाराष्ट्राच्या कानाकोपन्यात जाणाऱ्या एस.टी बस गाड्या मुरबाड स्थानकात थांबतात. त्यामुळे मुरबाड़ एस.टी. स्थानक महत्वाचे आहे. येथून दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात. त्यांच्या सोयीसाठी मुरबाड बसस्थानकाची नवी वास्तू लवकरच बांधण्यात येणार आहे. त्यासाठी १३ कोटी रूपयांचा निधी मंजूर आहे. एस.टी स्थानक परिसरातील अंतर्गत रस्त्यांसाठी ४ कोटी तसेच इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनसाठी ४ कोटी रूपये मंजूर आहेत. एस.टी. स्थानक आणि चार्जिंग स्टेशन झाले की ३० ए.सी. बस गाड्या मुरबाड तालुक्यातील प्रवाशांसाठी एस.टी. महामंडळाकडून उपलब्ध होणार असल्याची माहिती आमदार किसन कथोरे यांनी दिली.

जनतेच्या सेवेसाठी, विकासाच्या वचनबद्धतेसह

LET'S TALK