मुरबाड मतदार संघ हा राज्यातील सर्वच मोठ्या शहरांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याच अनुषंगाने एमएमआरडीएच्या पायलट प्रोजेक्ट अंतर्गत नवी मुंबई- तळोजा – मलंगड मार्गे अंबरनाथ आणि बदलापूर शहराला जोडणारा १० हजार कोटींचा महामार्ग उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या महामार्गाचा डीपीआर तयार करण्याचे काम टाटा कन्सल्टंट कंपनीच्या माध्यमातून सुरू आहे. एमएमआरडीएच्या या प्रकल्पामुळे कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, मुरबाड एवढेच नव्हे तर कर्जत परिसरही जलद मार्गाने जोडला जाणार आहे. नवी मुंबईकडे प्रवास करत असताना होणाऱ्या वाहतूक कोंडीला हा पर्यायी महामार्ग राहणार आहे.