यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या दालनात गेल्या वर्षी बैठक झाली. या बैठकीत या उड्डाण पुलाचे महत्व आमदारांनी सविस्तरपणे विषद केले. या उड्डाणपुलासाठी १८७ कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. त्यातील ८२ कोटीच्या कामाची निविदा एमएमआरडीएने काढली आहे. तर उर्वरीत काम रेल्वे प्रशासनामार्फत केले जाणार आहे. मुंबई महानगर आयुक्तांनी माननीय मुख्यमंत्र्यांकडे प्रशासकीय मान्यतेसाठी हा प्रस्ताव पाठवला होता. बदलापूरकरांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या या प्रकल्पाला आता प्रशासकीय मान्यता मिळाली असून लवकरच हे काम सुरू होणार आहे.