महाराष्ट्रातील १० जिल्हे, २६ तालुके आणि ३९० गावांमधून हा महामार्ग जातो. या महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी, आणि शिर्डी ते इगतपुरी या दोन टप्प्यांची वाहतूक सुरू झाली आहे. इगतपुरी ते ठाणे हा टप्पाही लवकरच सुरू होणार आहे. ग्रामीण भागातील उद्योजकांना आपली उत्पादने सर्वदूर पाठविण्यासाठी हा रस्ता अत्यंत उपयोगी ठरणार आहे. त्यामुळे कल्याण ग्रामीण, मुरबाड तालुक्यातील उद्योगांना चालना मिळून स्थानिकांना रोजगार मिळणार आहे.