VIKASPARV 5.0

Menu
Logo

बाह्यवळण रस्ते योजनेसाठी १६९ कोटींचा निधी

‘एमएमआरडीए’च्या ‘ओएआरडीएस’ (बाह्यवळण रस्ते विकास) योजनेअंतर्गत बदलापूर शहर तसेच अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यात फेब्रुवारी महिन्यात ९५ कोटी रूपयांच्या काँक्रिटच्या रस्ते कामांना मंजुरी मिळाली असून ती कामे प्रगतीपथावर आहेत. त्याचप्रमाणे जुलै महिन्यात याच योजनेतून आणखी ७४ कोटी ६७ लाख रूपयांचा निधी मंजूर झाला. अशा प्रकारे एकुण १६९ कोटींचा निधी मिळाल्याने मुरबाड मतदार संघातील रस्त्यांचा कायापालट झाला आहे. फेब्रुवारी महिन्यात मंजूर झालेल्या निधीतून विविध ठिकाणच्या ५३ रस्त्यांचे काँक्रिटीकरण मार्गी लागले आहे. 

त्यात बदलापूरमधील ‘यात्रिक हॉटेल ते गाडगीळ ज्वेलर्स’, ‘कात्रप पनवेलकर मॉन्टिना सोसायटी ते इंटरनॅशनल गुरूकुल स्कुल’, ‘बदलापूर गावातील रस्ते’, ‘बदलापूर गाव पवार पाडा ते इंडियन इको पार्क,’ ‘म्हाडा कॉलनी’, ‘बेलवली’, ‘शिरगांव भोसलेनगर’, ‘एरंजाड आणि सोनिवली’, ‘कात्रप विद्यालय ते गांवदेवी’, ‘हरीओम रेसिडेन्सी’, ‘यादवनगर-शिरगांव’ आदी रस्त्यांचे काँक्रीटीकरण होत आहे. अंबरनाथ तालुक्यातील कुडसावरे, टिटवाळा ते आंबेशिव भोपीपाडा, चोण, काराव, वांगणी, साई, चांदप, पिंपळोली, येवे, गोरेगांव आदी रस्त्यांचा या योजनेत समावेश आहे. कल्याण तालुक्यातील मांजर्ली, रायते, वाहोली,

जनतेच्या सेवेसाठी, विकासाच्या वचनबद्धतेसह

LET'S TALK