VIKASPARV 5.0

Menu
Logo

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेद्वारे रस्त्यांचे जाळे

बहुतांशी ग्रामीण भाग असलेल्या मुरबाड मतदार संघातील दुर्गम भागात असणारे गावपाड्यांमध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजना प्रभावीपणे राबवून विकासाच्या प्रगतीपथावर आणण्यात आमदार किसन कथोरे यांचे खूप मोठे योगदान आहे. गेली काही वर्षे सातत्याने या योजनेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी मिळवून आमदार किसन कथोरे यांनी मुरबाड मतदार संघातील ग्रामीण भागाचा कायापालट केला आहे. त्यामुळे मुरबाड मतदार संघात गाव तिथे खड्डेविरहीत काँक्रिटचा पक्का रस्ता असे चित्र आहे. या योजनेच्या माध्यमातून पूर्ण झालेल्या आणि प्रगतीपथावर असलेल्या रस्त्यांची कामे अनेक आहेत. त्यातील काही निवडक रस्त्यांचा उल्लेख इथे केला आहे. अंबरनाथ- ढोके – भिनारपाडा रोड, चामटोली ते तान रोड, मानकिवली-सावरोली-वराडे आणि इतर. 

मुरबाड- बेलपाडा (मासळे ते संतवाडी) बेंदरवाडी ते सिध्देश्वर वाडी (कातकारी वाडी), सोनावळे रोड, धानिवली ब्राह्मणगांव ते शिरगांव, आंबेगांव घागुर्ले रोड, माजगांव-कान्हर्ले सुयोगपाडा रोड. करवेले-असोसे हिरेघर रोड, केडुर्ली ते म्हाडस, भालूक मोरेपाडा रोड, माळ-सुकळवाडी- जांभूळवाडी भांगवाडी, साखरे रोड, भोईरवाडी-पेजवाडी रोड, ब्राह्मणगांव-वाघिवली रोड आणि इतर. कल्याण-नहगांव-बेलपाडा रोड, हेदुटणे-शिरढोळ रोड, कांबा-पावशेपाडा, उटणे-चिंचवली रोड, खडवली- वावेघर-ठाकुरपाडा रोड, टिटवाळा-म्हस्कळ रोड, बापसई-बेलकरपाडा रोड, वडवली बालेगाव ते वालकन रोड, आपटी रोड, पोई-ठाकुर पाडा रोड इत्यादी.

जनतेच्या सेवेसाठी, विकासाच्या वचनबद्धतेसह

LET'S TALK