कल्याण तालुक्यातील गावांतर्गत रस्त्यासाठी २५० कोटी मुरबाड मतदार संघात येणाऱ्या कल्याण तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींच्या हद्दीतील अंतर्गत रस्त्यांसाठी आमदार किसन कथोरे यांच्या प्रयत्नांनी २५० कोटी रूपयांचा निधी मिळाला. त्यातून ६८ गावे आणि २४ पालघांचे रस्ते काँक्रिटचे होत आहेत. रायते, पोटसई, फळेगाव, खहवली, जांभूळ, वसत, भिसोळ, मानिवली, रेवती, वाहोली, मांजर्ली, दहागाव, पोई, चवरे, रोहन, केळणी, मामणोली, कुंदे, म्हस्कल, उशीद, काकडपडा, पाळसोली, बेहेले, गरसे, कोसले, वाळकस, बेहेरे, वावेपर, उतणे, लिंबवली, वासंद्री, सांगोडे, कॉहरी, गुरवली, आणखर, आणखर पाड़ा आदी गावपात्यांचा यात समावेश आहे.