VIKASPARV 5.0

Menu
Logo

बारवी डॅम रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाची २९० कोटी

बारवी डॅम रोडच्या काँक्रिटीकरणासाठी १६० कोटी संपूर्ण ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणाकडे जाण्यासाठी असलेला डांबरी रस्ता पावसाळ्यात काही ठिकाणी खचत असल्यामुळे तो संपूर्ण रस्ता काँक्रीट करण्याचा निर्णय आमदार किसन कथोरे यांनी घेतला आणि त्यानुसार या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी एमआयडीसी प्रशासनाकडे मागणी केली. या रस्त्याचा आराखडा तयार करण्यात आला असून त्यासाठी तब्बल १६० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या कामाची निविदा करून लागलीच कामाला सुरुवात होणार आहे. अंबरनाथच्या वडवली तलावापासून या रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार असून थेट बारवी डॅम पर्यंत हा रस्ता तयार केला जाणार आहे या रस्त्याच्या मजबुतीकरणामुळे बारवी डॅम रोडवर असलेल्या गावांना चांगली कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.

बारवी डॅम ते मुरबाड काँक्रीट रस्त्यासाठी १३० कोटी बारवी डॅम पासून मुरबाड पर्यंत जाण्यासाठी डांबरी रस्ता असल्यामुळे तो रस्ता देखील अनेक ठिकाणी खचत होता त्यातच हा संपूर्ण परिसर जंगलाने व्यापला असल्याने हा रस्ता कायमस्वरूपी दर्जेदार व्हावा यासाठी आमदार किसन कथोरे यांनी एमआयडीसी प्रशासनाला या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार १३० कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो प्रस्ताव निविदेच्या अंतिम टप्प्यात आहे. या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर बदलापूरकरांना बारवी डॅम मार्गे मुरबाड आणि पुढे माळशेज घाटापर्यंत पोहोचणे सहज शक्य होणार आहे.

जनतेच्या सेवेसाठी, विकासाच्या वचनबद्धतेसह

LET'S TALK