तीन जिल्ह्यांना जोडतो वाहतुकीच्या दृष्टीने माळशेज घाट अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. हा घाट ठाणे अहमदनगर आणि पुणे या तीन जिल्ह्यांना जोडतो. शिर्डी, शनिशिंगणापूर, भीमाशंकर या धार्मिक स्थळांना जाण्यासाठी भाविक याच मार्गाने जातात. पुण्याकडे जाताना वाटेत शिवरायांची जन्मभूमी असलेला शिवनेरी किल्ला लागत असल्याने शिवप्रेमी याच मार्गाने जाणे पसंत करतात.
पावसाळी पर्यटनाची पर्वणी माळशेज घाट आणि पावसाळा यांचे अनोखे नाते आहे. पावसाळ्यात येथील निसर्ग सौंदर्य डोळ्यांचे पारणे फेडतो. घाट माथ्यावरून कोसळणारे छोटे छोटे धबधबे पर्यटकांना खुणावत असतात. रोड साईड पावसाळी पर्यटनाचा आनंद देणार हक्काचे ठिकाण म्हणजे माळशेज घाट…