मुरबाड विधानसभा मतदार संघात बदलापूर पूर्व, बदलापूर पश्चिम आणि मुरबाड या विद्युत वितरण विभागाच्या अंतर्गत गेल्या पाच वर्षात उच्च दाबाचे (एच टी), कमी दाबाचे (एल टी) नवीन पोल उभारणे, ट्रान्स्फार्मर बसविणे, नवीन वीजवाहिन्या टाकणे आदी कामे करण्यात आली आहेत.
सन २०१९- २०२० या वर्षात बदलापूर पूर्व, बदलापूर पश्चिम आणि मुरबाड मध्ये दोन कोटी रुपयांची कामे झाली आहेत. सन २०२० २०२१ या वर्षात बदलापूर पूर्व, बदलापूर पश्चिम आणि मुरबाडमध्ये तीन कोटी ८४ लाखांची कामे झाली.
सन २०२१-२०२२ या वर्षांत बदलापूर पूर्व, बदलापूर पश्चिम आणि मुरबाड विभागात एक कोटी २७ लाखांची कामे करण्यात आली. २०२२ – २०२३ या वर्षात बदलापूर पूर्व, बदलापूर पश्चिम आणि मुरबाड या विभागात दोन कोटी ७२ लाखांची कामे करण्यात आली.
२०२३ – २०२४ या वर्षात बदलापूर पूर्व, बदलापूर पश्चिम आणि मुरबाड या विभागात सात कोटी ६४ लक्ष रुपयांची कामे करण्यात आली आहेत.